Golden Jubilee Alumni Meet at Dr PDKV Akola

897

JNU 2020- PKV 1980

जेएनयू २०२० – पिकेव्ही १९८०

I was shocked and deeply saddened when I read about incidence in JNU last month!! Irrespective of political ideology, violence by any group needs to be strongly opposed. In view of this I remembered an incidence of 80, s when I was student at DrPDKV (Then PKV) Akola. I clearly memorise that, for some funny reason our entire batch did not appear for an examination of one paper. Later, Associate Dean of our college declared that this examination will not be held again. The meaning was explicitly clear that we all were declared “fail” in that subject.

मागच्या महिन्यात JNU मधील घटनेबद्दल ऐकले तेंव्हा मला तीव्र दुख: झाले आणि धक्का बसला!! राजकीय विचारसरणीच्या पलीकडे जाऊन विचार केला तर कोणत्याही जमावाने केलेल्या हिंसेचा जोरकस विरोधच करायला हवा. या संदर्भात मला १९८० च्या एका घटनेची आठवण झाली. मी तेंव्हा डॉ.पीकेव्ही ( तेंव्हाचे PKV ) अकोला येथे विद्यार्थी होतो.मला स्पष्ट आठवते, काहीतरी मजेशीर कारणाने आमच्या सर्व वर्गाने परीक्षेचा एक पेपर दिला नाही. नंतर आमच्या अधिष्ठात्यांनी (Dean) जाहीर केले की या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही. याचा अर्थ स्पष्ट होता. आमचा  सर्व वर्ग त्या विषयात नापास, असे जाहीर केले गेले.

In very confused state of mind our batch gathered at hostel. Everyone was worried about parent’s reaction. We also came to know from sources that Associate Dean was sending the telegrams to all student’s home, informing parents that “your beloved son is failed in subject”!!  Somehow, our shock and freighted mood got converted into an anger. We decided to “Gherao” Dean in his cabin.

आम्ही सगळे गोंधळून गेलो. आणि वसतिगृहात एकत्र झालो. प्रत्येकाला आपापल्या पालकांच्या प्रतिक्रियेची काळजी वाटायला लागली. आम्हाला कुठूनतरी असेही कळले की आमचे अधिष्ठाता आमच्या सर्वांच्या घरी “ आपले लाडके चिरंजीव – या विषयात नापास झाले आहेत” अश्या मजकुराची तार पाठवणार आहेत. आमच्या साठी हे धक्कादायक आणि भीतीदायक होते. पण समूहात त्याचे रुपांतर रागात झाले. आम्ही अधिष्ठात्यांना त्यांच्या कार्यालयात घेराव घालायचे ठरवले.

We reached Deans, office and “Gheraoed” him. After about two hours our patience was getting challenged. Dean was very cool, though we were not allowing him to move from chair. He was even not permitted to go for urine.

आम्ही अधिष्ठात्यांच्या कार्यालयात पोहोचलो आणि घेराव घातला. साधारण २ तास आमची सहनशीलता पणाला लागली होती. अधिष्ठाता पूर्णपणे संयमात आणि शांततेत होते. आम्ही त्यांना जागचे हलू देत नव्हतो. लघुशंकेला सुद्धा जाऊ देत नव्हतो.

 After about three hours one of our fellow student said that all are hungry so Dean should order food. Dean agreed for that as well, but his stand was crystal clear about failing the entire batch in that subject.  One of the student from the group instantly got up from crowd and thrown gum bottle and ink towards Dean!! His telephone wire was cut. All did not agree to this action. But mob mentality is very bad. Students started becoming violent. So, Registrar on his own had to inform police for controlling the students.

साधारण ३ तासांनी आमच्यातला एक विद्यार्थी म्हणाला आम्हाला सर्वांना भूक लागली आहे आणि अधिष्ठात्यांनी सर्वांसाठी जेवण मागवावे. अधिष्ठाता या गोष्टीला सुद्धा तयार झाले. पण त्यांची आम्हा सर्वांना त्या विषयात नापास करण्याची भूमिका  स्पष्ट होती. आमच्यातला एक जण अचानक गर्दीतून उठला. त्याने डिंकाची आणि शाईची बाटली अधिष्ठात्यांच्या अंगावर फेकली. त्यांची फोनची वायर तोडली. आम्हा  सर्वांना ही कृती आवडली नाही. पण समूह मानस वेगळे असते.विद्यार्थी हिसक होऊ लागले. विद्यार्थांना नियंत्रणात आणण्यासाठी कुलसचिवांनी ( Registrar) स्वत:हून पोलिसांना कळविले. 

After some time, police entered campus. As soon Dean realized that police force is entering the campus, his first reaction was, “how did police entered campus without my permission?”  Still students were uncontrolled and locked the Deans cabin from inside. Finally, when students became more violent, police entered cabin with force and started little “lathi charge”.

काही वेळाने पोलीस विद्यापीठाच्या आवारात आले. पोलीस विद्यापीठाच्या आवारात येताहेत हे अधिष्ठात्यांना लक्षात आल्या  क्षणी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती—“ पोलीस माझ्या परवानगी शिवाय विद्यापीठाच्या आवारात कसे येऊ शकतात? एवढे होऊनही विद्यार्थी नियंत्रणाबाहेर होते आणि त्यांनी अधिष्ठात्यांचे कार्यालय आतून बंद केले.जेव्हा परिस्थिती अधिकच आटोक्याबाहेर जाऊ लागली तेंव्हा पोलीस बळेने आत घुसले आणि सौम्य लाठीमार सुरु केला.

I starkly remember the feeble words of  Generous Dean in that chaotic situation as well, “please don’t beat my students”!!

 याही अवस्थेत आमच्या मोठ्यामनाच्या अधिष्ठात्यांचे उद्गार मला आज स्पष्ट आठवतात  “ कृपा करून माझ्या विद्यार्थांना मारू नका.”

Next day morning we all students gathered at hostel and went to dean’s home for saying sorry to him. Further our examination was held with strict warning of not to misbehave again.  “In ICAR credit system examination pattern under *I* grade , Dean has authority to conduct/ repeat the examination for   extra ordinary circumstances”

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही सगळे पुन्हा वसतीगृहात जमलो आणि नंतर अधिष्ठात्यांच्या घरी जाऊन त्यांची क्षमा मागितली. नंतर आम्हा सर्वाना पुन्हा असे बेशिस्त न वागण्याची सक्त ताकीत देऊन आमची परीक्षा घेतली गेली. ( ICAR credit system exam प्रमाणे विशेष परिस्थितीत पुन्हा परीक्षा घेण्याचे अधिकार त्यांना होते.)

25 years later during the jubilee ceremony at University campus Akola, same Dean (then retired) during his speech said “1983 batch was the best & taught me bonding between teachers and students”!!   

२५ वर्षांनी  रोप्य महोत्सवात विद्यापीठाच्या आवारात अकोल्याला त्याच अधिठात्यांनीं ( तेंव्हा निवृत्त) त्यांच्या भाषणात सांगितले १९८३ ला पास झालेली batch सर्वोत्तम होती. आणि विद्यार्थी – शिक्षक यांच्यातले नातेसंबंध त्यांनी मला शिकवले.

On this backdrop I am very sorry for JNU incidence and feel that our society is really becoming intolerant to listen different viewpoints. “JAI HIND”

JNU च्या पार्श्वभूमीवर विविध विचार ऐकून घेण्याच्या बाबतीत आपल्या समाजाची सहनशीलता कमी – कमी झाल्याचे बघून वेदना होतात.  जय हिंद

Leave A Reply